मित्रहो,

आपल्या देशात आजपर्यंत अनेकांनी ‘शेतकरी’ या शब्दाच्या भोवती अनेक चक्रे फिरवली. कुणाचा किती आणि कसा फायदा झाला या चिकित्सेत पडण्यात अर्थ नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
सत्य परिस्थिती अशी दिसते की काम करण्यासाठी अजूनही स्कोप आहे. सगळयाच आघाड्यांवर काम करणे ही इच्छा असली तरी शक्ती आणि इतर साधनांचा अभाव नाकारता येणार नाही परंतु इतक्या वर्षापासून मनात असलेली उर्जा स्वतःला जाळण्यात लावण्यापेक्षा जे शक्य आणि अतीनिकडीचे वाटते त्यासाठी चालना देणारी व्यवस्था उभी करावी यासाठी ‘शेतकरी बॉईज’ या फाउडेशन ची कल्पना सत्यात उतरवीत आहे.
काळ बदलला तसा शेतकऱ्याची मुलं शिक्षण व्यवयासासाठी बाहेर पडली आणि देशातील अनेक आघाड्यांच्या पदांवर ते सध्या यशस्वीरीत्या धुरा सांभाळत आहेत. त्या प्रत्येकाच्या मनात आपल्या गावासाठी काही न काही चांगलं करण्याची इच्छा आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या वेळ आणि इतर जुळवाजुळवीच्या कवायतीमुळे ही पावले अडखळत आहेत अशा पावलांना पुन्हा एकदा गावाकडे वळविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही आघांडयावर सक्षम असणारा शेतकरी हा या जगातील कुठल्याही संकटाला समर्थपने तोंड देऊ शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे.

आपला ,
दिपक शेषराव पवार
शेतकरी बॉईज

Dear Friends.
In our great nation, many people have spoken about the issues of Shetkari (KISAAN / FARMERS). Unfortunately the discourse has remained futile over the years. How many farmers have been benefited till the date? I think it is not a question to be asked. As a matter of fact, we see a lot of scope for work. Though work on all the avenues of growth could have been our ambition but due to constraints of time and unavailability of resources we have limited our sectors to work on. Instead of burning our brain just on thinking, we have decided to work for utmost important avenues of growth those are Health and Education. Hence we have formed this platform of ‘Shetkari-boys’ foundation.
With the passage of time ‘Shetkari-boys’ immigrated from their villages to urban areas for education and occupations. Some of them are working at top designations with considerable earnings and most of them are living happy life. They wish to contribute for the advancement of their own villages but the desired time and other managerial complications are stopping them to do so. ‘Shetkari-boys’ foundation is a platform to motivate such types of well wishers of Indian farmers.
We believe that the farmer community having good education and health can fight with any sort of difficulty in life and also can find their own ways to acquire prosperous life.

Yours sincerely,
Dipak S. Pawar